"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

1.      गावाविषयी माहिती

आकरे  हे महाराष्ट्र राज्यातील पालघर  जिल्ह्यातील जव्हार  तालुक्यातील एक सूर्या नदीच्या काठावर वसलेले प्रमुख गाव आहे.आकरे गावात गावदेवाचे प्रमुख मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे आकरे  या गावाला पूर्वी या गावाला पूर्वी खोती गावअसेही संबोधले जात होते, सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या २०२१  सुमारे  आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ४ , अंगणवाडी केंद्रे ४ व व्यायामशाळा १,सभामंडप-६ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये सन २०१५ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत आकरे  ने , पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

2.  गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात,नाचणी,उडीद,वरई  ही प्रमुख पिके घेतली जातात. शेतीपुरक व्यवसाय बकरी पालन केले जाते.

3.       आकरे  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आकरे  गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. प्रगती प्रतिष्ठान अंतर्गत काही पाड्यांना पाईप लाईन करून पाणीपुरवठा केला आहे तसेच संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान मध्ये  आकरे  विशेष गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासन पुरस्कुत तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत सन २०१३-२०१४ पारितोषिक प्राप्त गाव बक्षीस रुपये- लक्ष रुपये  प्राप्त झाला.

4.  ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ११ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

5.  आकरे  गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

2. भौगोलिक स्थान

आकरे  हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे २५  कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ १३८२.८४.०० हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये  वार्ड आहेत. एकूण ६७४  कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या २७१४  आहे. त्यामध्ये १८४  पुरुष  १२३६  महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने डोंगर दर्यांचा प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन कमी आहे तसेच गावालगत अवघ्या ५०० मी अंतरावर सूर्या नदी व पल्शीन नदीचा संगम होतो. येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे,त्यामुळे मोठ्या प्रमाणात सागवन जंगलात आढळते उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

आकरे गावात मोठ्या प्रमाणात भात,नाचणी,उडीद पिके घेतली जातात

3. लोकजीवन

आकरे गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय भात,नाचणी,वरई व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह पशुपालन,बकरी पालन शेतीपुरक व्यावसाय केला जातो.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

आकरे च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

ग्रामपंचायत आकरे, जव्हार

विकास कामांची माहिती: पायाभूत सुविधा: आकरे ग्रामपंचायतीमध्ये एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. शिक्षण आणि बालविकास: 'प्रगती प्रतिष्ठान'च्या मदतीने जव्हार तालुक्यातील आकरे येथील वाकीचा पाडा आणि बेहेडपाडा येथे बालवाड्या सुरू आहेत. या बालवाड्यांमध्ये तीन ते सहा वयोगटातील सुमारे पस्तीस मुलांना खेळ आणि शिक्षणाचे धडे दिले जातात. आदिवासी विकास प्रकल्प: जव्हार आणि मोखाडा तालुके हे आदिवासी बहुल असल्याने, आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत अनेक योजना राबवल्या जातात. स्पर्धा आणि उपक्रम: आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत जव्हारमध्ये स्पर्धांचे आयोजन केले जाते, जे विकासासाठी एक सकारात्मक पाऊल मानले जाते. आकरे येथील विकास माहिती आकरे हे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामधील एक आदिवासी बहुल गाव आहे. येथील विकासकामांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे: ग्रामीण संपर्क: आकरे नवापाडा ते कान्हातपाडा या रस्त्याच्या बांधकामासह ग्रामीण संपर्क सुधारण्यावर भर दिला गेला आहे. जलसंधारण: गावातील पारंपरिक जलस्रोत जसे की सिमेंट बंधाऱ्यांमधील गाळ काढणे आणि जलसंधारणाची इतर कामे करण्यात आली आहेत. कृषी आणि फलोत्पादन: वैयक्तिक जमिनींवर फळझाडांची लागवड (उदा. काजू, आंबा) आणि कृषी संबंधित इतर विकासकामे (उदा. जमीन सुधारणा) केली गेली आहेत. गृहनिर्माण: प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत वैयक्तिक घरांचे बांधकाम देखील सुरू आहे. जव्हार तालुक्यातील विकास माहिती

प्रशासकीय संरचना


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


674
2714
1184
1236

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo